Saturday, 21 April 2012

सुखाचा रविवार

असा सुखाचा रविवार असावा,
हातात पेपर अन  चहा असावा.

थोडासा नवरा आणि थोडीशी मुले,
त्यांचा थोडासा सहवास असावा.

स्वयंपाक सकाळी झाला असावा,
संध्याकाळी किचनला टाळा असावा.

शनिवारी एखादा पिक्चर असावा,
सकाळी उठण्याचा अलार्म नसावा.

मोबाईल नको नि फोन नसावा,
ऑफिसचा कुठला संताप नसावा.

दुपारची झोप आणि आळस असावा,
पण, कुठे जाण्याचा प्रोग्राम नसावा.

गर्दी नको, गजबजाट नसावा,
थोडासा का होईना, एकांत असावा.

असावा असावा रविवार असावा,
असा सुखाचा रविवार असावा.

No comments:

Post a Comment

Followers