Friday 8 November 2013

थेंक्स

इंग्रज गेले आणि जाता जाता शब्द देऊन गेले.  थेंक्स आणि सॉरी. पण हे शब्द कधी कधी खूप कमाल करतात. खूप उपयोगी शब्द आहेत हे आणि ह्याचा अनुभव मला थोड्या वर्षांपूर्वी आला तो असा.
त्या वेळी आम्ही जवळजवळ दर आठवड्यांनी गावाला जायचो. घर जवळ होते. रेल्वेने तासाचा रस्ता. मग काय शनिवार आला कि चाललो गावी. स्टेशनवर तिकिटासाठी त्यावेळी महिलांची वेगळी लाइन असायची - ती पुढे बंद करून एकच लाइन झाली - महिला पुरषांची एकत्र. ती लाइन खूप मोठी असायची. मुलगा लहान होता. त्यामुळे दर वेळी समान असायचेच.
मी तिकीट घेताना सुटे पैसे बरोबर ठेवायचे कि त्या मुळे त्या गरदी मध्ये वेळ जायला नको. तिकीट घेतले कि नेहेमी मी खिकीवरच्या माणसाला "थेंक यु" म्हणायचे.  दर वेळी एकाच माणूस असतो कि वेगळा हे कशाला बघतेय मी?
एक दिवस स्टेशनवर पोचलो आणि बघते तर लाइन खूप मोठी होती. मुलाला एका बाजूला उभा ठेवून मी लाइन मध्ये थांबले. गाडीची वेळ होत आली होती. आणि त्यातच खिडकी वरचे मशीन बंद पडले. मग काय? लोकांचा आरडा ओरडा आणि मधेच शिरणारे लोक! एकच खिडकी चालू होती आणि मी त्या लाइन मध्ये नव्हते. आता तिथे जायचे म्हणजे लाइन च्या शेवटी थांबायचे!
मी विचार केला कि आज गाडी जाणार. कारण गाडीची लाइन झाली होती.  आजून माझ्या पुढे - लोक होते. इतक्यात तिथल्या बाजूच्या खिडकीतून एका माणसांनी मला हाक मारली " ताई, इकडे ... " मी दचकुन पहिले तर तो खिडकीवाला माणूस मला बोलावत होता. मी तिथूनच विचारले कि काय आहे?
तो म्हणाला "तुम्हाला घोलवडचे तिकीट हवे आहे ना? "
मी: " हो पण खिडकी बंद झाली आहे , कधी सुरु होईल आता?"
तो: "इकडे पैसे द्या मी काढून देतो तिकीट."
मी पुढे होऊन पैसे दिले. त्याने मला तिकीट आणून दिले आणि म्हणाला "ताई तुम्ही नेहेमी सुटे पैसे आणता आणि तिकीट घेतल्यावर "थेंक यु" म्हणता. मला ते फार चांगले वाटते. आम्ही तर आमचे काम करत असतो पण पण तरी तुम्ही "थेंक यु" म्हणता!  जा आता लवकर. गाडी वेळेवर आहे.  नीट जा."
मी पटकन तिकीट घेतले आणि परत थेंक यु म्हणाले. अनायास मला पण हसू आले आणि त्या माणसाचा हसरा चेहेरा बघून मी प्लेटफॉर्म कडे जायला निघाले.

Followers