Wednesday 4 July 2012

स्वातंत्र्य

मला वारा पिऊन रहायचंय,

अन चांदण्यात न्हायचंय,

आला आला ,पाउस ,

मला चिंब चिंब व्हायचंय.

 

किती धन दौलत मी घेऊ,

किती सोने अंगी लेऊ,

जरतारी धाग्यांची किती मी,

बंधने बांधून घेऊ?

 

हि बंधने सारी तोडून,

मला आकाशात उडायचं.

मला वारा पिऊन रहायचंय,

अन चांदण्यात न्हायचंय.

 

 

मातीचा करून बिछाना,

दगडाला घेउन उशाला,

चांदण्यांची करून दुलई अन,

वाऱ्याचा मधुर तराणा.

 

चांदण्यांच्या संगे रात्री,

मला पण न्हाऊन जायचंय.

मला वारा पिऊन रहायचंय,

अन चांदण्यात न्हायचंय.

 

 

चेहेऱ्यावर  चेहेरे लावून,

मुखवटे लावून लावून.

खोटे जगणे खोटे हसू अन,

खोटे खोटे आसू.

 

मुखवटे सारे तोडून,

मला पुन्हा मी व्हायचं.

मला वारा पिऊन रहायचंय,

अन चांदण्यात न्हायचंय,

 


(ऐरोली - विक्रोळी बस जुलै 2007 )

No comments:

Post a Comment

Followers