Monday, 15 July 2013

दिन ढल जाए हाए रातभी जाए

दिन ढल जाए हाए रातभी जाए,
छुट्टी ना आए उसकी याद सताए।

ऑफिस में मेरा सब दिन बीता,
बैठे हैं लैपटॉप थाम । 
 ट्रेकर के मारे हाल हुआ ये,
बैठे हैं सिरको थाम ।

ट्रेकर बने पर ग्राफ ना बन पाए ।


ऐसी ही FD ऐसे ही चेंजिस,
ऐसी डिफेक्टकी बरसात।

दिन भर लड़ें  हम कोड के साथ
और, HPQC  के साथ।

काश ये फेज अब फिरसे न आए।

 
कट ओवर के कितने,  पास हैं जितने,
गो लाइव  से कितने दूर।

मैनेजर हमसे हम, लोड से परेशां,
दोनों हैं मजबूर ।

ऐसे में किसको कौन मनाए ।

Sunday, 9 June 2013

विरोधाभास

ऑफिसमध्ये एक जण  ६ महिन्याकरिता जर्मनीहून आला होता.  गेले काही महिने तो आमच्या बरोबर जेवत होता. इथल्या गणपती, दिवाळीचा त्याने अनुभव घेतला होत. एक दिवस जेवता जेवता आमच्या गप्पा चालल्या होत्या. 
 
त्याने तिथे मिळणारा मसाला डोसा घेतला होत. एकाने शाकाहारी जेवण, तर एकाने चिकन. एकाचा  उपवास म्हणून त्याचा फलाहार. एक घरून डबा आणत असे.  
 
त्याला विचारले कि कसे वाटते आहे इथे भारतात? आणि हा मसाला डोसा तिखट नाही लागत? तर हसून म्हणाला, "मला आवडले इथे. हे जेवण पण आवडले मला. हे थोडे तिखट आहे, पण छान आहे. मला मुंबई, पुणे, आगरा सगळे खूप आवडले. पण  इथे सगळे खूप confusing  आहे. खूप विरोधाभास आहेत इथे. 
 
आता हेच पाहा ना.  हा चिकन खातो आहे, आणि हा दुसरा आज उपवास आहे म्हणून नुसती फ़ळे. आणि तो एक कधीच उपवास करत नाही तरी शुध्ध शाकाहारी आहे. असे कसे?
  
म्हटले हे तर काहीच नाही, इथे तुला प्रत्येक गोष्टीत विरोधाभास आणि ते सुध्धा आगदी पराकोटीचे, बघायला मिळतिल. 
 
एकाच घरात एक शुध्ध शाकाहारी आणि एकाला मांसाहारा शिवाय घास गळ्याखाली जाणार नाहि. 
 
एकाच घरात मुलाचे काय लाड! आणि त्याच घरात मुलगी नकुशी!
 
एकाच घरात ४ पिढ्या एकत्र नांदतात आणि एखाद्या घरात ४ माणसे पण नाहीत! विभक्त कुटुंब, त्यात मुले नवरा-बायको आणि एक मुल. 
 
एकाच  घरात एक देव-धर्म, पूजा-अर्चा करणारा आस्तिक आणि त्याच घरात एक जण देव न मानणारा. नास्तिक. 
 
एखाद्या घरात एक व्यायामाचा भोक्ता आणि एक आळश्यांचा राजा. 
 
एकाच घरात एक खाऊन खाऊन रोगांना निमंत्रण देणारा आणि एक कुपोषित.
 
एकाच घरात एक गायनाचा रसिक आणि एक मात्र औरंगझेब!
 
एकाच घरात एक मुलगी परंपरा जपणारी, भारतीय पोशाकात राहणारी तर तिचीच बहिण पाश्चात्य कपड्यात वावरणारी.  एकीला साडी शिवाय काही आवडत नाही आणि एकीला साडी आवडत नाहि. 
 
एखाद्या घरात सासू सुनेला छळणारी, तिला जाळून मारणारी तर एखाद्या घरात सून सासूच्या डोक्यावर भारी. 
 
एखादी डोक्या पासून पायापर्यंत सोन्याने मढलेली तर एखादी लंकेची पार्वती. 
 
एखाद्याच्या एक वेळच्या जेवणाला हजारो रुपये, तर एखाद्याला एक वेळ चे जेवण महाग. 
 
कुठे कपड्यांचे ढीग कापटात साचलेले, तर कुठे अंग झाकायला ५ वार नाही. 
 
कुणाच्या घरी पाण्याचा नळ भसाभसा वाहातोय तर कोणाची पाण्यासाठी दाही दिशेला वणवण. 
 
कोणी लाखो करोडो खाऊनही अतृप्त तर कोणी दुसर्याचे हरवलेले लाखो परत करून तृप्त. 
 
कोणी टेकड्या फोडून, डोंगर ओरबाडून गब्बर होणारे तर कोणी पर्यावरण संवर्धन करून आयुष्य वेचणारे. 
 
कोणी मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि कोणी लोकांसाठी जिवाचे रान करणारे. 
 
 कोणी जात-पात मानणारे आणि कोणी आंतरजातीय विवाहाचे समर्थक.
 
काही धर्म वेडे तर काहींना सर्व धर्म समान. 
 
कोणी बाबा- महाराज-बुवा-भगतांच्या मागे लागून स्वताच्या किंवा दुसर्याच्या लेकरांची आयुष्ये संपवणारे तर कोणी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात आयुष्य घालवणारे. 
 
कोणी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी पर्यंत वाट वाकडी करणारा आणि एकासाठी सर्व सार्वजनिक ठिकणेच कचराकुंडी!
 
कोणी देशाला विकून खाणारा आणि कोणी देशासाठी सीमेवर सदा तैनात. 
 
कोणी प्राणिमित्र तर कोणी प्राण्यांच्या व्यापार्यांचे मित्र.
 
एक लाल दिवा लागला म्हणून रस्त्यात थांबणारा, आणि एक वाहतुकीची साधी शिस्त न पाळता, लाल दिवा लागला म्हणून थांबलेल्याला मागून धडकून त्याचा जीव घेणारा.    
 
एक पैश्यांसाठी मत विकणारा आणि एक मत न देता व्यवस्थेवर शिव्या घालणारा.
 
कोणी समाजातल्या वाइटाविरुध्ध ठाम उभे ठाकणारे  आणि आम्ही नुसतेच गप्पामारून कोणतिही ठोस कृती न करणारे !
 
खरेच किती विरोधाभास आहे!
 
सर्व जण विचार करत उठलो. जेवण झाले होते. कामाला लागायची वेळ झाली होती. 
 

Sunday, 23 September 2012

कोई इवेंट दिल को बहलाता नहीं

कोई इवेंट दिल को बहलाता नहीं.
छुट्टीके दिनमें भी करार आता नहीं.

मैं कोई Functional नहीं ABAPer हूँ,
कैसे कह दूँ, Load से घबराता नहीं.

सेल्फ इनपुट पोर्टलोंको तोड़ दो,
अप्रेइसल में कुछ नजर आता नहीं.

मीटिंग्स, ट्रेकर्स, दुनिया भरके कॉल है,
इनके बिना अब दिन गुजर जता नहीं.

ट्यूब लाईटका उजाला चारों ओर,
सन लाईट दिन में भी नजर आता नहीं.

सुबह हुई, ऑफिस में ही रात हुई,
घरका ठिकाना याद क्या आता नहीं?

कोई इवेंट दिल को बहलाता नहीं.
छुट्टीके दिनमें भी करार आता नहीं.

Saturday, 22 September 2012

काल आणि आज


एक दिवस मी रोजच्या सारखी ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट बघत रस्त्यावर थांबले होते. समोरून एक काका आणि एक तरुण मुलगी रस्ता ओलांडून आले. ती मुलगी माझ्या जवळ येऊन थांबली आणि मला विचारू लागली कि अमुक एका ठिकाणी जाण्यासाठी इथून बस मिळेल का? मी म्हटले कि इथून तिथे जाण्या साठी बस तर नाही मिळणार पण सहा आसनी रिक्षा मिळेल. रस्त्यात एका ठिकाणी उतरून मग दुसरी रिक्षा बघावी लागेल. 

मग रिक्षा कुठे थांबतील, वगेरे चौकशी तिचे वडील करू लागले. थोडे काळजीत असतील असे वाटले.
थोड्या वेळानी एक सहा आसनी रिक्षा आली. ती मुलगी त्यात बसून जाऊ लागली. जाताना वडिलांना हात हलवून टाटा - बाय बाय करून गेली.  पोचलीस कि फोन कर असा काळजीयुक्त सल्ला द्यायला वडील विसरले नाहीत.

मी माझी बस येते आहे का हे बघायला लागले. मग ते काका मला सांगू लागले " कॉलेजात चालली आहे. आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. आम्ही  इथे नवीन आहोत,  काही माहिती नाही आहे. म्हणून तिला म्हटले कोणाला विचारून बघ. फोन करेल आता ती - कॉलेजला पोहोचलीकी . आमच्या गावात आजून मुली कोणी शिकत नाही बघा. हिच्या सगळ्या मैत्रिणींची लग्ने  झाली. पण मी म्हटले तिला कि तू शिकायचे. खूप हुशार आहे ती. " काका स्वताहून बोलत होते. मी नुसती हसून मान डोलावली. काका दूर जाणाऱ्या रिक्षा कडे बघून मग मागे फिरले.

किती साधी घटना ! पण त्या घटने मुळे  विचारांचे चक्र सुरु झाले.

रात्री बघितलेल्या रमाबाई रानडेंच्या मालिकेची दृश्ये परत एकदा दिसू लागली. घरातल्या सगळ्यांचा शिक्षणाला विरोध.  त्यांनी शिकू नये म्हणून केलेले एक एक उपाय. बायकांना  सततचे घरकाम, कोणते स्वातंत्र्य नाही. लहान वयात लग्न, मुले, प्रपंच. कसे आयुष्य होते ते ! विचार करून पुन्हा खूप अस्वस्थ वाटले.
मग आठवले माझे लहानपण. 

मी आणि बहिण खूप लहान असताना आम्हाला आणि घरच्यांना सांभाळून  शिकणारी  आई. मग शिक्षण झाल्यावर शाळेच्या नोकरी साठी हट्ट धरणारी आई. शाळेत जायला  उशीर नको आणि घराची कामे पण झाली पाहिजे म्हणून पहाटे उठणारी आई.  सकाळी ७ वाजता सगळा स्वयंपाक आवरून घराबाहेर पडणारी आई. शाळेत पोहोचायला उशीर नको म्हणून भराभर चालणारी शिस्तप्रिय आई . आणि नुसते नोकरी आणि आहे तेवढ्या शिक्षणावर समाधान न मानता पुढे शिकणारी आई.   'एम. एड.' ला गोल्ड  मेडल मिळवणारी आई.

काळ   बदलायला  सुरुवात झालीच होती.

पण नुसते एका हातानी टाळी वाजत नाही.  जसे यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीर बाई असते. तसे यशस्वी बाईच्या मागे कुठे तरी पुरुष पण असतो. कधी विरोध करून तिची जिद्द वाढविणारा तर कधी मदत करून तिचा मार्ग सुखकर करणारा.

त्या मुलीच्या मागे तिचे वडील असेच उभे असतील म्हणून ती आजच्या काळात कोलेजात जात असताना तिला सोडायला काळजीने, कौतुकाने तिचे वडील बरोबर आले.

बस आली. मी बस मध्ये चढले. रस्त्या पलीकडे ते काका उभे होते. फोन वर कोणाशी तरी बोलत होते. मला सहज वाटून गेले कि त्यांनी मुलीलाच फोन केला असेल. पाठमोऱ्या काकांकडे बघितले आणि मला माझे बाबा आठवले.

सुरुवातीला आईच्या नोकरीला नापसंत करणारे आणि नंतर तिला लागेल ती मदत करणारे. आमच्या प्रत्येक निर्णयाला पाठींबा देणारे आणि त्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगणारे. आमच्या साठी काळजी करणारे आणि आमचा आभिमान बाळगणारे. वेळ पडली कि रागावणारे  पण आमचे सगळे लाड, हट्ट  पुरविणारे.  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हा मुलींवर कधी मुलगी म्हणून कोणती बंधने न टाकणारे. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देणारे आणि त्या बरोबर येणाऱ्या जवाबदारीची जाणीव करून देणारे माझे बाबा.

बस पुढे जात होती. 

म्हटले काळ पुढे चालला आहे हे किती बरे आहे.

आजही जरी मुलींना पूर्ण स्वतंत्र्य नसले, आजही हुंडाबळी जात असले, आजही  मुलींना दुय्यम वागणूक मिळत असेल, त्या सुरक्षित नसतील तरी सगळे काही निराशाजनक नाही आहे.

ज्या लहानश्या गावातून आजही ज्या वयात मुलींची लग्ने  करून टाकण्याची पध्धत आहे त्याच गावातून एक वडील मुलीला शिकायला शहरात घेऊन येतात हे उद्याच्या आणखीन चांगल्या भविष्याचे चित्र नाही का?

Followers