Sunday, 11 August 2013

न पाहिलेला वाघ

कुठे तरी फिरायला जायचे खूप दिवसांपासून मनात होते. कधी सुट्ट्या नाहीत म्हणून तर कधी आणखीन काही तरी कारण, पण योग काही येत नव्हता. तो आला शेवटी ह्या फेब्रुवारी मधे.  आम्ही कॉर्बेट नेशनल पार्क ला जायचे ठरविले
सगळी तयारी झाली, तिकिटे झाली आणि आम्ही एकदाचे पोहोचलो कॉर्बेटला. 
 
तिथे ढीकुली नावाच्या गावात हॉटेल मध्ये बुकिंग होते. रात्री आम्ही तिथे पोहोचलो. दुसऱ्या  दिवशी सकाळी सफारी ठरवली होती
 
सकाळी उत्साहात ६ वाजताच नोघलो. जीप आलीच होती. ड्राईवर ला पहिला प्रश्न विचारला कि "काल कोणाला वाघ दिसला होता का? आपण ज्या दरवाज्यातून जाणार आहोत त्या भागात वाघ कधी दिसला होता?"
 
ड्राईवर हसूनच म्हणाला "सगळे पर्यटक हाच प्रश्न विचारतात. पण ते हे विसरून जातात कि ते खऱ्या  जंगलात जात आहेत. प्राणीसंग्रहालयात नाही. "  पुढे म्हणाला "आपण मोकळ्या जंगलात जात आहोत. वाघ दिसेल कि नाही काही सांगू शकत नाही. ते नशीब आहे.  पण मोकळेपणी  फिरणारे जे प्राणी दिसतील त्यांना बघण्याचा आनंद घ्या.   वाघ दिसायचा तर आत्ता इथे रस्त्यावर पण दिसू शकतो. आणि नाही तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला सफारी करून पण दिसत नाही. काल संध्याकाळच्या सफारीमध्ये ४ जिप्सी एका पाठोपाठ जात होत्या त्यात फक्त एका जिप्सीला वाघ दिसला पुढे गेलेल्या तीन जिप्सींना वाघाचा आवाज पण ऐकू आला नाही. पण जंगल खूप सुंदर आहे. असा अनुभव तुम्ही कधी घेतला नसेल. "
 
आमची जीप निघाली. थोड्या वेळानी जंगलात जाण्याच्या गेट जवळ पोहोचलो. तिथे योग्य ती कागदपत्रे दाखवून आणि परवाना घेऊन थांबलो. आमचा गाईड तिथून आमच्या बरोबर येणार होता. तो आला आणि जंगलाची माहिती सांगू लागला. त्याने पण हेच सांगितले कि जंगल मोठे आहे आणि वाघ मुक्त संचार करत असतो त्या मुळे तो दिसेलच असे सांगू शकत नाही.  आपण प्रयत्न करू कि तो दिसेल. 
 
पुढे निघलो. गर्द जंगल. मोठे मोठे वृक्ष. आजून जेमतेम उजाडत होते त्या मुळे काही वेगळेच भारावलेले वातावरण. पक्ष्यांचे आवाज.  आणि जीपची घुरघुर. 
 
५ मिनिटे पण झाली नसतील आणि रस्त्याच्या बाजूला हरणे दिसली. आम्ही जीप थांबवली. त्याने इंजीन पण बंद केले.  हरिणे शांतपणे चरत होती. कोणी काही बोलत नव्हते. पटापट फोटो काढून झाले. शेवटी गाईड म्हणाला कि आता चालूया, हरिणे पुढेपण खूप दिसतील. आम्ही पुढे निघालो .
 
अचानक परत जीप थांबली. गाईड ने जीपच्या बाजूला बघायला सांगितले. पहिले तर रस्त्याच्या धुळीत वाघाचे ठसे पडले होते. रात्री किंवा पहाटे वाघ तिथून गेला होता आणि त्या नंतर आमची जीपच तिथे आली असेल कारण ठसे एकदम स्पष्ट होते. आम्ही गप्प राहून इकडे तिकडे बघू लागलो. 
 कुठलाही आवाज नाही. जीप चे इंजिन बंद. पक्ष्यांचे आवाज मधून मधून येत होते. वाघ जरी दिसला नाही तरी ती शांतता, ते हिरवेगार जंगल, ती थंडी, झाडांच्या पानातून येणारा सूर्यप्रकाश,  सगळेच अद्भूत वाटत होते. 
 
परत गाइडनेच त्या अद्भूत जगातून बाहेर आणले आणि आम्ही पुढे निघालो. 
१ तासाच्या त्या सफारीत नंतर आम्ही अनेक हरणे, सांभर, मोर, बार्किंग डीअर, १ कोल्हा  वगेरे पाहिले. 
 
पहिली सफारी संपली. आम्ही जंगलाचा आनंद घेऊन पण वाघ न बघता परत आलो. 
 
दुसऱ्या  दिवशी दुपारची सफारी ठरवली होती. आम्ही तयार झालो आणि निघालो. त्या ड्राईवरने न विचारताच सांगायला सुरुवात केली कि वाघ दिसणे हे नशिबावर असते आज सकाळच्या सफारीत वाघ कोणालाच दिसला नाही. 
आम्ही गेट वर पोहोचलो. तिथले सगळे सोपस्कार करून, गाईड घेऊन पुढे निघालो. हरिणांच्या कळपाने आमचे जणू स्वागतच केले. 
 
मग सांभर, मोर, लंगूर वगेरे बघत आम्ही पुढे निघालो. पुढे एक सुकलेले नदी पात्र लागले. रस्ता त्यातून पुढे जात होता. आम्ही नदी ओलांडून पुढे गेलो आणि एक मोठी हत्तीण दिसली. तिच्या बरोबर तिचे पिल्लू होते. अचानक त्या हत्तीणीने मोठा, बिगुल सारखा आवाज काढला आणि आम्ही थांबलो. इकडे तिकडे बघत होती तोच समोरून २ जिप्सी येताना दिसल्या. त्यातल्या एका जिप्सीचा ड्राईवर आम्हाला मागे जायला सांगत होता. 
 
थोडे जवळ आल्या नंतर तो म्हणाला कि त्यांना वाघ दिसला आहे, तो नदीच्या वरच्या बाजूनी पत्रातून खालच्या बाजूला येत आहे. आम्ही सगळे मागे फिरलो आणि नदी पत्रात जाऊन थांबलो. 
 
१०-१५ मिनिटे तिथे थांबलो पण  वाघ काही दिसला नाही. 
 
आम्ही सगळे परत फिरलो. 
 
आता काही सफारी ठरलेली नव्हती त्या मुळे आता वाघ दिसण्याची शक्यता नव्हती. आम्ही काहीसे खट्टू झालो होतो पण जंगल इतके सुंदर होते आणि इतके शांत होते कि तो आनंद पण खूप होता. शिवाय ऑफ सिझन ला गेलो होतो त्यामुळे कुठे गरदी, गोंगाट, घाण नाही. आपण भारतात आहोत कि बाहेर असे वाटावे इतके सगळे शांत आणि स्वच्छ होते. 
 
तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पक्षी बघायला निघालो. एक २०-२२ वर्षाचा मुलगा आमचा गाईड होता.  चालत निघालो होतो तेव्हा तो सतत माहिती सांगत होता. आम्ही चलात तिथल्या सस्पेन्शन ब्रिज जवळ पोहोचलो. खाली कोसी नदी वहात होती. अंगाला गार वारा झोंबत होता. नदीच्या समोरच्या काठाला जंगल होते. सीताबनी चे जंगल.  ब्रिज पार केला कि रस्ता पुढे जातो. त्याच्या एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या  बाजूला खाली नदी. नदी कधी दिसते कधी झाडीमुळे फक्त आवाज येतो. आम्ही पुढे निघालो. साधारण एक किलोमीटर असा रस्ता असेल आणि मग समोर गिरिजादेवीचे नदीपत्रातल्या खडकावर उभे असलेले मंदिर दिसते. आम्ही त्या मंदिरात आधीच जाऊन आलो होतो म्हणून परत काही गेलो नाही. 
 
पुढे थोडे अंतर गेल्यावर रस्ता दाट जंगलात जात होता. गाईड म्हणाला कि आता पुढे जाने धोक्याचे आहे आपण मागे फिरु. आम्ही परत वळलो. 
 
आम्हाला इथपर्यंत येताना बरेच पक्षी दिसले.  सगळे साधारण भारतीय पक्षी होते आणि जवळ जवळ सगळे इथे पुण्याला पण दिसतात. आम्हाला सातभाई, मोर, पोपट, टिटवी, बुलबुल चे ४ प्रकार, Wall creaper, दयाळ आणि दुसरे पक्षी दिसले. 
 
परत आम्ही त्या रात्याला लागलो.   एका बाजूला सीताबनी चे जंगल आणि दुसऱ्या  बाजूनी नदीचा आवाज येत होता. आम्ही काही बघत , बोलत चाललो होतो. हा रस्ता गावकऱ्यांचा नेहेमीचा रस्ता होता. अचानक एक माणूस समोरून आला. खरे तर जंगल बघण्याच्या नादात तो कोणत्या बाजूनी आला हे नीट  कळलेच नव्हते. तो आमच्या बरोबर गावाच्या दिशेला चालू लागला. त्याच्याकडे एक कुऱ्हाड होती आणि डोक्यावर लाकडांची मोळी. 
 
तो गाईडशी बोलू लागला कि त्याने वाघाचा आवाज ऐकला आणि घाबरून तो अर्ध्या रस्त्यातून परत फिरला. आम्ही ४ जण आहोत म्हणून आता आमच्या सोबतीने तो परत गावाकडे चालला आहे.  "बाघ कि आवाज सुनी और मै घाबरा गया. अकेला आदमी हून, कोई हथियार नाही ही, सो वापस चला आया था. अब सब साथमे है तो वापस चलता हुं. "
 
मला वाटले कि आम्ही टुरिस्ट आहोत हे बघून हा माणूस बाता मारतो आहे. आम्ही पुन्हा रमत गमत चालू लागलो. थोडे पुढे गेल्यावर तो माणूस म्हणाला "यही पर आवाज आइ थी. जलदी निकल चलो. जानवर शायद आसपास हि हो. " तो भराभर पुढे जाऊ लागला. आम्ही तिथे थांबलो आणि खरोखर ह्या नेहेमीच्या रस्त्यावर वाघाचा आवाज येतो का ते ऐकायला थांबलो. 
 
आणि अचानक खरोखर वाघाची डरकाळी आम्हाला ऐकू आली. चांगले ६ -७ सेकंद तो आवाज कुठून तरी जंगलाच्या दिशेने वरती जी झाडे होती तिथून आवाज येत होता. आम्ही सगळे गप्प.
वाघाचा आवाज खरोखर ऐकायला येतो आहे ह्यावर विश्वास बसत   नव्हता. पण तरी छातीत धडधड होत होती. गाईड घाई करू लागला. आम्ही पुढे निघणार तो परत वाघाची डरकाळी ऐकू आली. आता मात्र खरोखर भीती वाटली. जर वाघ खरोखर समोर आला तर काय होईल हा विचार मनात आला. हातात ३ छत्र्या होत्या. वाघ दिसला तर त्या छत्रीला तो घाबरून पळेल का कि घाबरल्या मुळे आम्ही पळूच शकणार नाही असा विचार आला. 
 
आम्ही इकडे तिकडे बघत होतो. आता आवाज पण बंद झाला होता. आम्ही भरभर पुढे निघालो. तो मोळीवाला माणूस केव्हाच निघून गेला होत. 
 
थोडे पुढे गेल्यावर सस्पेन्शन ब्रिज दिसला आणि मोकळ्या जागेत आलो. 
 
तिथे परत नदी दिसली. 
मागे वळून पहिले आणि त्या न दिसलेल्या पण ऐकलेल्या वाघाला सांगितले कि "वाघारे, आता नाही दिसलास हे बरेच केले. पण आम्ही परत येऊ तुला बघायला. तेव्हा आम्हाला दर्शन दे. अश्या रस्त्यात नाही पण सफारीला जाऊ तेव्हा दर्शन दे. आता मात्र तुझा आवाज मनात साठवून आम्ही जातो आहोत."
 
कोर्बेटहून आम्ही परत फिरलो ते न बघितलेल्या वाघाच्या आठवणी आणि त्याला परत जाऊन बघण्याची इच्छा घेऊनच
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Monday, 15 July 2013

दिन ढल जाए हाए रातभी जाए

दिन ढल जाए हाए रातभी जाए,
छुट्टी ना आए उसकी याद सताए।

ऑफिस में मेरा सब दिन बीता,
बैठे हैं लैपटॉप थाम  
 ट्रेकर के मारे हाल हुआ ये,
बैठे हैं सिरको थाम

ट्रेकर बने पर ग्राफ ना बन पाए


ऐसी ही FD ऐसे ही चेंजिस,
ऐसी डिफेक्टकी बरसात।

दिन भर लड़ें  हम कोड के साथ
और, HPQC  के साथ।

काश ये फेज अब फिरसे आए।

 
कट ओवर के कितनेपास हैं जितने,
गो लाइव  से कितने दूर।

मैनेजर हमसे हम, लोड से परेशां,
दोनों हैं मजबूर

ऐसे में किसको कौन मनाए 

Sunday, 9 June 2013

विरोधाभास

ऑफिसमध्ये एक जण  ६ महिन्याकरिता जर्मनीहून आला होता.  गेले काही महिने तो आमच्या बरोबर जेवत होता. इथल्या गणपती, दिवाळीचा त्याने अनुभव घेतला होत. एक दिवस जेवता जेवता आमच्या गप्पा चालल्या होत्या. 
 
त्याने तिथे मिळणारा मसाला डोसा घेतला होत. एकाने शाकाहारी जेवण, तर एकाने चिकन. एकाचा  उपवास म्हणून त्याचा फलाहार. एक घरून डबा आणत असे.  
 
त्याला विचारले कि कसे वाटते आहे इथे भारतात? आणि हा मसाला डोसा तिखट नाही लागत? तर हसून म्हणाला, "मला आवडले इथे. हे जेवण पण आवडले मला. हे थोडे तिखट आहे, पण छान आहे. मला मुंबई, पुणे, आगरा सगळे खूप आवडले. पण  इथे सगळे खूप confusing  आहे. खूप विरोधाभास आहेत इथे. 
 
आता हेच पाहा ना.  हा चिकन खातो आहे, आणि हा दुसरा आज उपवास आहे म्हणून नुसती फ़ळे. आणि तो एक कधीच उपवास करत नाही तरी शुध्ध शाकाहारी आहे. असे कसे?
  
म्हटले हे तर काहीच नाही, इथे तुला प्रत्येक गोष्टीत विरोधाभास आणि ते सुध्धा आगदी पराकोटीचे, बघायला मिळतिल. 
 
एकाच घरात एक शुध्ध शाकाहारी आणि एकाला मांसाहारा शिवाय घास गळ्याखाली जाणार नाहि. 
 
एकाच घरात मुलाचे काय लाड! आणि त्याच घरात मुलगी नकुशी!
 
एकाच घरात ४ पिढ्या एकत्र नांदतात आणि एखाद्या घरात ४ माणसे पण नाहीत! विभक्त कुटुंब, त्यात मुले नवरा-बायको आणि एक मुल. 
 
एकाच  घरात एक देव-धर्म, पूजा-अर्चा करणारा आस्तिक आणि त्याच घरात एक जण देव न मानणारा. नास्तिक. 
 
एखाद्या घरात एक व्यायामाचा भोक्ता आणि एक आळश्यांचा राजा. 
 
एकाच घरात एक खाऊन खाऊन रोगांना निमंत्रण देणारा आणि एक कुपोषित.
 
एकाच घरात एक गायनाचा रसिक आणि एक मात्र औरंगझेब!
 
एकाच घरात एक मुलगी परंपरा जपणारी, भारतीय पोशाकात राहणारी तर तिचीच बहिण पाश्चात्य कपड्यात वावरणारी.  एकीला साडी शिवाय काही आवडत नाही आणि एकीला साडी आवडत नाहि. 
 
एखाद्या घरात सासू सुनेला छळणारी, तिला जाळून मारणारी तर एखाद्या घरात सून सासूच्या डोक्यावर भारी. 
 
एखादी डोक्या पासून पायापर्यंत सोन्याने मढलेली तर एखादी लंकेची पार्वती. 
 
एखाद्याच्या एक वेळच्या जेवणाला हजारो रुपये, तर एखाद्याला एक वेळ चे जेवण महाग. 
 
कुठे कपड्यांचे ढीग कापटात साचलेले, तर कुठे अंग झाकायला ५ वार नाही. 
 
कुणाच्या घरी पाण्याचा नळ भसाभसा वाहातोय तर कोणाची पाण्यासाठी दाही दिशेला वणवण. 
 
कोणी लाखो करोडो खाऊनही अतृप्त तर कोणी दुसर्याचे हरवलेले लाखो परत करून तृप्त. 
 
कोणी टेकड्या फोडून, डोंगर ओरबाडून गब्बर होणारे तर कोणी पर्यावरण संवर्धन करून आयुष्य वेचणारे. 
 
कोणी मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि कोणी लोकांसाठी जिवाचे रान करणारे. 
 
 कोणी जात-पात मानणारे आणि कोणी आंतरजातीय विवाहाचे समर्थक.
 
काही धर्म वेडे तर काहींना सर्व धर्म समान. 
 
कोणी बाबा- महाराज-बुवा-भगतांच्या मागे लागून स्वताच्या किंवा दुसर्याच्या लेकरांची आयुष्ये संपवणारे तर कोणी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात आयुष्य घालवणारे. 
 
कोणी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी पर्यंत वाट वाकडी करणारा आणि एकासाठी सर्व सार्वजनिक ठिकणेच कचराकुंडी!
 
कोणी देशाला विकून खाणारा आणि कोणी देशासाठी सीमेवर सदा तैनात. 
 
कोणी प्राणिमित्र तर कोणी प्राण्यांच्या व्यापार्यांचे मित्र.
 
एक लाल दिवा लागला म्हणून रस्त्यात थांबणारा, आणि एक वाहतुकीची साधी शिस्त न पाळता, लाल दिवा लागला म्हणून थांबलेल्याला मागून धडकून त्याचा जीव घेणारा.    
 
एक पैश्यांसाठी मत विकणारा आणि एक मत न देता व्यवस्थेवर शिव्या घालणारा.
 
कोणी समाजातल्या वाइटाविरुध्ध ठाम उभे ठाकणारे  आणि आम्ही नुसतेच गप्पामारून कोणतिही ठोस कृती न करणारे !
 
खरेच किती विरोधाभास आहे!
 
सर्व जण विचार करत उठलो. जेवण झाले होते. कामाला लागायची वेळ झाली होती. 
 

Sunday, 23 September 2012

कोई इवेंट दिल को बहलाता नहीं

कोई इवेंट दिल को बहलाता नहीं.
छुट्टीके दिनमें भी करार आता नहीं.

मैं कोई Functional नहीं ABAPer हूँ,
कैसे कह दूँ, Load से घबराता नहीं.

सेल्फ इनपुट पोर्टलोंको तोड़ दो,
अप्रेइसल में कुछ नजर आता नहीं.

मीटिंग्स, ट्रेकर्स, दुनिया भरके कॉल है,
इनके बिना अब दिन गुजर जता नहीं.

ट्यूब लाईटका उजाला चारों ओर,
सन लाईट दिन में भी नजर आता नहीं.

सुबह हुई, ऑफिस में ही रात हुई,
घरका ठिकाना याद क्या आता नहीं?

कोई इवेंट दिल को बहलाता नहीं.
छुट्टीके दिनमें भी करार आता नहीं.

Saturday, 22 September 2012

काल आणि आज


एक दिवस मी रोजच्या सारखी ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट बघत रस्त्यावर थांबले होते. समोरून एक काका आणि एक तरुण मुलगी रस्ता ओलांडून आले. ती मुलगी माझ्या जवळ येऊन थांबली आणि मला विचारू लागली कि अमुक एका ठिकाणी जाण्यासाठी इथून बस मिळेल का? मी म्हटले कि इथून तिथे जाण्या साठी बस तर नाही मिळणार पण सहा आसनी रिक्षा मिळेल. रस्त्यात एका ठिकाणी उतरून मग दुसरी रिक्षा बघावी लागेल

मग रिक्षा कुठे थांबतील, वगेरे चौकशी तिचे वडील करू लागले. थोडे काळजीत असतील असे वाटले.
थोड्या वेळानी एक सहा आसनी रिक्षा आली. ती मुलगी त्यात बसून जाऊ लागली. जाताना वडिलांना हात हलवून टाटा - बाय बाय करून गेलीपोचलीस कि फोन कर असा काळजीयुक्त सल्ला द्यायला वडील विसरले नाहीत.

मी माझी बस येते आहे का हे बघायला लागले. मग ते काका मला सांगू लागले " कॉलेजात चालली आहे. आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. आम्ही  इथे नवीन आहोतकाही माहिती नाही आहे. म्हणून तिला म्हटले कोणाला विचारून बघ. फोन करेल आता ती - कॉलेजला पोहोचलीकी . आमच्या गावात आजून मुली कोणी शिकत नाही बघा. हिच्या सगळ्या मैत्रिणींची लग्ने  झाली. पण मी म्हटले तिला कि तू शिकायचे. खूप हुशार आहे ती. " काका स्वताहून बोलत होते. मी नुसती हसून मान डोलावली. काका दूर जाणाऱ्या रिक्षा कडे बघून मग मागे फिरले.

किती साधी घटना ! पण त्या घटने मुळे  विचारांचे चक्र सुरु झाले.

रात्री बघितलेल्या रमाबाई रानडेंच्या मालिकेची दृश्ये परत एकदा दिसू लागली. घरातल्या सगळ्यांचा शिक्षणाला विरोधत्यांनी शिकू नये म्हणून केलेले एक एक उपाय. बायकांना  सततचे घरकाम, कोणते स्वातंत्र्य नाही. लहान वयात लग्न, मुले, प्रपंच. कसे आयुष्य होते ते ! विचार करून पुन्हा खूप अस्वस्थ वाटले.
मग आठवले माझे लहानपण

मी आणि बहिण खूप लहान असताना आम्हाला आणि घरच्यांना सांभाळून  शिकणारी  आई. मग शिक्षण झाल्यावर शाळेच्या नोकरी साठी हट्ट धरणारी आई. शाळेत जायला  उशीर नको आणि घराची कामे पण झाली पाहिजे म्हणून पहाटे उठणारी आईसकाळी वाजता सगळा स्वयंपाक आवरून घराबाहेर पडणारी आई. शाळेत पोहोचायला उशीर नको म्हणून भराभर चालणारी शिस्तप्रिय आई . आणि नुसते नोकरी आणि आहे तेवढ्या शिक्षणावर समाधान मानता पुढे शिकणारी आई.   'एम. एड.' ला गोल्ड  मेडल मिळवणारी आई.

काळ   बदलायला  सुरुवात झालीच होती.

पण नुसते एका हातानी टाळी वाजत नाही.  जसे यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीर बाई असते. तसे यशस्वी बाईच्या मागे कुठे तरी पुरुष पण असतो. कधी विरोध करून तिची जिद्द वाढविणारा तर कधी मदत करून तिचा मार्ग सुखकर करणारा.

त्या मुलीच्या मागे तिचे वडील असेच उभे असतील म्हणून ती आजच्या काळात कोलेजात जात असताना तिला सोडायला काळजीने, कौतुकाने तिचे वडील बरोबर आले.

बस आली. मी बस मध्ये चढले. रस्त्या पलीकडे ते काका उभे होते. फोन वर कोणाशी तरी बोलत होते. मला सहज वाटून गेले कि त्यांनी मुलीलाच फोन केला असेल. पाठमोऱ्या काकांकडे बघितले आणि मला माझे बाबा आठवले.

सुरुवातीला आईच्या नोकरीला नापसंत करणारे आणि नंतर तिला लागेल ती मदत करणारे. आमच्या प्रत्येक निर्णयाला पाठींबा देणारे आणि त्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगणारे. आमच्या साठी काळजी करणारे आणि आमचा आभिमान बाळगणारे. वेळ पडली कि रागावणारे  पण आमचे सगळे लाड, हट्ट  पुरविणारे.  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हा मुलींवर कधी मुलगी म्हणून कोणती बंधने टाकणारे. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देणारे आणि त्या बरोबर येणाऱ्या जवाबदारीची जाणीव करून देणारे माझे बाबा.

बस पुढे जात होती

म्हटले काळ पुढे चालला आहे हे किती बरे आहे.

आजही जरी मुलींना पूर्ण स्वतंत्र्य नसले, आजही हुंडाबळी जात असले, आजही  मुलींना दुय्यम वागणूक मिळत असेल, त्या सुरक्षित नसतील तरी सगळे काही निराशाजनक नाही आहे.

ज्या लहानश्या गावातून आजही ज्या वयात मुलींची लग्ने  करून टाकण्याची पध्धत आहे त्याच गावातून एक वडील मुलीला शिकायला शहरात घेऊन येतात हे उद्याच्या आणखीन चांगल्या भविष्याचे चित्र नाही का?

Followers